You are currently viewing शिक्षक भारतीची कॅशलेस योजना शिक्षकांसाठी वरदान ठरेल:- सी.डी. चव्हाण

शिक्षक भारतीची कॅशलेस योजना शिक्षकांसाठी वरदान ठरेल:- सी.डी. चव्हाण

देवगड तालुका शिक्षक भारती सहविचार सभेत प्रतिपादन

तळेरे:-प्रतिनिधी

शिक्षक भारतीची सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ कॅशलेस योजना जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निश्चितच वरदान ठरणार आहे, म्हणून जास्त जास्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा.त्याचबरोबर या कॅशलेस कार्डाबरोबर डिजिटल कार्डही देण्यात येणार असल्याने कुटुंबासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक भारतीचे राज्य प्रतिनिधी सी.डी चव्हाण यांनी शिरगाव येथील सभेत व्यक्त केले.
देवगड तालुका शिक्षक भारती सहविचार सभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव समीर परब, सल्लागार सुरेश चौकेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिरगाव हायस्कूलचे प्राचार्य शमसुद्दीन आत्तार, जिल्हा संघटक आकाश पारकर, सहसंघटक सागर फाळके, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दत्तात्रय मारकड, जिल्हा पदाधिकारी सतीशकुमार कर्ले, तालुका अध्यक्ष हेमंत सावंत, तालुका सचिव संजय खोचरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष हेमंत सावंत व सचिव संजय खोचरे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले.
दरम्यान मार्गदर्शन करताना सुरेश चौकेकर म्हणाले की,शिक्षक भारती ही संघटना फक्त शिक्षकांसाठीच नव्हे तर, समाजातील वंचित घटकांसाठी,अगदी तळागाळातील महिलांचाही गुणगौरव करणारी राज्यातील व जिल्ह्यातील एकमेव शासनमान्य शिक्षक संघटना आहे. त्या संघटनेचे आपण सर्वजण शिलेदार आहोत ही अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.
यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर,सचिव समीर परब, प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय मारकड, व कार्यक्रमाचे अध्यक्ष शमसुद्दीन आत्तार यांनीही मनोगत व्यक्त करताना शिक्षक भारतीच्या विविध स्तरावरील कार्याचा आढावा घेत देवगड तालुक्यातील शिलेदारांचे विशेष कौतुक केले.
देवगड तालुक्याच्यावतीने माजी जिल्हा सचिव तथा विद्यमान जिल्हा सल्लागार शिक्षक सुरेश चौकेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सहृदय सत्कार करण्यात आला.तर जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्ह्याच्या तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे प्रसिद्ध तंत्रस्नेही शिरगावचे शमसुद्दीन आत्तार यांना जिल्हा सल्लागार पदावर नियुक्ती प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षक भारतीच्या कार्याने प्रेरित होऊन आपण संघटनेत सहभागी झालो असल्याचे आवर्जून सांगितले.
यासभेत मान्यवरांच्या उपस्थितीत देवगड तालुका कार्यकारिणी विस्तार करण्यात आला व सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपेश बांदेकर यांनी तर आभार संजय खोचरे यांनी मानून सभेची सांगता करण्यात आली.

शिरगाव :- सहविचार सभेत जिल्हा पदाधिकारी यांच्या समवेत देवगड तालुक्यातील पदाधिकारी व शिलेदार

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =