जयेंद्र रावराणे व संजय सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्लीत भेट.

जयेंद्र रावराणे व संजय सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्लीत भेट.

वैभववाडी

माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे माजी नगरसेवक संजय सावंत भाजपा पदाकाऱ्यासह केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची दिल्ली येथे भेट घेतली. व त्यांना शुभेच्छा दिल्या. कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय उद्योगमंत्री पदी निवड झाल्यानंतर वैभववाडी तालुक्यात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला होता.
रविवारी जयेंद्र रावराणे, संजय सावंत यांच्या सोबत तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांचे अभिनंदन करण्यासाठी थेट दिल्ली गाठली. यामध्ये माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगरसेवक संजय सावंत, भाजपा पदाधिकारी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर कदम, शरद नारकर, रवी किशोर चव्हाण यांचा समावेश होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा