तुळसुली येथे कोंबड्याच्या खुराड्यात घुसलेल्या अजगराला जीवदान…

तुळसुली येथे कोंबड्याच्या खुराड्यात घुसलेल्या अजगराला जीवदान…

कुडाळ

भक्ष्याच्या शोधार्थ कोंबड्याच्या खुराड्यात घुसलेल्या भल्यामोठ्या अजगराला जीवदान देण्यात आले.ही घटना आज तुळसुली येथे घडली.संबंधित अजगर हा येथील रहिवासी रवी वारंग यांच्या घराशेजारील पडवीत कोंबड्यांच्या खुराड्यात आला होता.दरम्यान त्यांनी याबाबतची माहिती सर्पमित्रांना दिली.त्यानुसार आरोग्य कर्मचारी श्री.तेंडुलकर व श्री.गावडे यांनी शिताफीने त्या अजगराला पकडत नैसर्गिक अधिवासात सोडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित अजगराने गेले काही दिवस परिसरात अनेकांची कोंबडी फस्त केली होती.त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले होते.मात्र त्या अजगराला जेरबंद करण्यास यश आल्याने सगळ्यांचीच चिंता मिटली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा