गुगल या जगप्रसिद्ध कंपनीच्या सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातून व पाथ संस्थेच्या वतीने कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट (PSA प्लांट ) बसविण्यात येणार आहे व २५० केव्ही जनरेटर पुरविण्यात येणार आहे. हा प्लांट बसविण्याच्या दृष्टीने पाथ संस्थेची टीम पाहणीसाठी जिल्ह्यात दाखल झाली होती. १ हजार लिटर एवढी या ऑक्सिजन प्लांटची क्षमता असणार आहे. त्याबाबतचे पत्र पाथ संस्थेच्या डॉ. जयश्री यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्याकडे सुपूर्द केले. याबद्दल आ.वैभव नाईक यांनी गुगल कंपनी,पाथ संस्था व जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आभार मानले. यावेळी कुडाळ वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद वालावलकर उपस्थित होते.
गुगल कंपनी व पाथ संस्थेच्या वतीने कुडाळ महिला बाल रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसविणार
- Post published:जुलै 16, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments