You are currently viewing तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला आज मनसेची धडक..

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला आज मनसेची धडक..

कृषी योजना कागदावरच गाव पातळीवर कृषी योजना पोचत नसल्याचा मनसेचा गंभीर आरोप.. प्रसंगी आंदोलन छेडू पदाधिकार्‍यांचा इशारा..

तालुक्यातील एका महिलेचा सर्पदंशाने दोन वर्षांपूर्वी मृत्यू पण प्रस्ताव पाठवून सुद्धा मागील दोन वर्षे मोबदला मिळण्यास विलंब मनसेने वेधले तालुका कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष

आज मनसेच्या शिष्टमंडळाने तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी यांची विविध विषयावर भेट घेतली त्यात कृषी योजना ह्या गाव पातळीवर पोचत नसल्याचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला तर अधिकारी श्री पाटील यांनी आपण सर्व स्तरावर कर्मचारी नेमले आहेत असे सांगितले तर उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी नेमले असता तुमच्या योजना पोहोचत का नाहीत? ते कर्मचारी असतात कुठे? यावर अधिकारी निरुत्तर. तसेच कृषी अधिकाऱ्यांना जर ते योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवता येत नसेल तर आता मनसे त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा पुढाकार घेईल असे उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले तसेच तालुक्यातील एका महिलेचा दोन वर्षांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला होता तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या अंतर्गत त्यांच्या नातेवाईकांनी मोबदला मिळावा ह्यासाठी प्रस्ताव पाठवला होता तर दोन वर्षे उलटूनही त्याचा मोबदला का मिळाला नाही असे उपस्थित पदाधिकारी श्री सुधीर राऊळ यांनी उपस्थित केला व तात्काळ त्याची दखल घ्यावी असे पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित अधिकारी यांना सांगितले तर तालुका कृषी विभाग व जिल्हा कृषी विभाग यांच्यात समन्वय नसल्याचे समजते. या सर्व बाबींची गंभीर दखल घ्यावी व तसेच मनसेच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर आम्हीही या सर्व बाबींचा पाठपुरावा करून व आपल्याकडून नाही याची गंभीर दखल घेण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईल कृषी विभागावर खळ खट्याक करण्यात येईल असे मनसेच्या शिष्टमंडळाने कडून सांगण्यात आले यावेळी परिवहन जिल्हाध्यक्ष ऍड राजू कासकर उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर उपाध्यक्ष शुभम सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + sixteen =