You are currently viewing ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे  यांच्या नेतृत्वाखाली महासंघाच्या मोठ्या पदी वर्णी लागण्याची शक्यता

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे  यांच्या नेतृत्वाखाली महासंघाच्या मोठ्या पदी वर्णी लागण्याची शक्यता

पदाबाबत राज्यातून गेलेल्या शिफारशीवर दिल्ली येथील प्रदान कार्यालयाकडून शिक्‍कामोर्तब

जिल्हा कार्यकारणीसहीत, आठही तालुका कार्यकारणी मध्ये होणार बदल

सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अमोल जंगले यांनी दिली माहिती

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब,डोंगरदऱ्या, खोऱ्यात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास मदत करणारा व समाजाच्या न्याय हक्कासाठी अखंड देशभर संघटन बांधणी करून समाज कार्य करणारा महासंघ म्हणजे ऑल इंडिया धनगर समाज महासंघ… या महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवा नेतृत्व नवलराज काळे यांच्या रूपाने कोकण भूमीत पदार्पण झाले. नवलराज काळे यांची कोकण मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका युवक आघाडी अध्यक्ष पदी 31 जुलै 2016 रोजी निवड झाली. खऱ्या अर्थाने कोकणच्या भूमीमध्ये महासंघाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातून सुरू झालं. त्यानंतर काळे यांची तीन वेळा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली. 2015 पासून काळे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सभासद राहिले,2015 ते 2021 असा एकूण सहा वर्षाचा कार्यकाल नवलराज काळे यांनी प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महासंघाचे एकनिष्ठेने व सक्षम पणे काम पाहिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याची मजबुत बांधणी करत समाजाच्या प्रत्येक अडचणींना न्याय देण्याचे काम काळे यांनी या पदावर ती असताना केलं, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये धनगर वाडी वस्ती वर प्रत्येक घरांमध्ये, प्रत्येक समाज बांधवांन पर्यंत नवलराज काळे यांनी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच नाव, ध्येय, उद्दिष्टे व कार्य पोचवलं. जिल्ह्यातील इतर संघटनेना विश्वासात घेत, ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत समाजमध्ये नवलराज काळे यांनी युवकांना प्रेरणा देईल असं काम केलं. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे साहेब टाकलेली जबाबदारी खांद्यावर पेलत अनेकांचा विरोध धुडकावत, तर काही विरोधकांना आपलंसं करत, आपल्या सोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची,कार्यकर्त्यांची काळजी घेत नवलराज काळे यांनी एक एक समाजबांधव जोडला. व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठही तालुक्यामध्ये आपल्या महासंघाच्या कार्यकारणी उभ्या केल्या व महासंघातर्फे धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष उभा केला आणि तो संघर्ष महासंघाचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता प्रवीण काकडे साहेब यांच्या सहित नवलराज काळे यांच्या नेतृत्व खाली असाच पुढे चालू ठेवेल असा आमचा विश्वास आहे. व महासंघातर्फे जिल्ह्यात असेच काम पुढे चालू ठेवू असे आश्वासन ही महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष ना आम्ही देतो.नवलराज काळे यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे साहेब यांनी त्यांच्या कार्याची शिफारस दिल्ली येथील प्रधान कार्यालयाला केली असून दिल्ली प्रधान कार्यालयातून नवलराज काळे यांच्या कार्याची दखल घेत काळे यांना मिळणाऱ्या मोठ्या पदाबद्दल शिक्कामोर्तब करण्यात आला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान उपाध्यक्ष अमोल जंगले यांनी दिली. कोणते पद दिले जाणार हे थोड्याच दिवसात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे साहेब जाहीर करतील. मात्र काळे यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्ग सहित कोकण प्रदेश मध्ये महासंघाच्या संघटनात्मक बांधणीला नक्कीच चालना मिळेल असा आमचा विश्वास आहे. प्रदेश अध्यक्ष प्रवीणजी काकडे साहेब यांनी जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकावर विश्वास दाखवला तो नक्कीच आम्ही सर्व सिंधुदुर्ग वासीय सार्थकी लावू असा विश्वास व्यक्त करत कोकण सहित महाराष्ट्रातील प्रत्येक समाज बांधवांनी, समाजातील अनेक मंडळे, संघटना प्रतिष्ठाने, यांनी संघटना वाद, प्रांतवाद,पोट जातीय वाद बाजूला ठेवून ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र यावं अस आवाहन देखील सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अमोल जंगले यांनी यावेळी केले. काळे यांच्या मोठ्या निवडीमुळे जिल्ह्यातील कार्यकारिणीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आठही तालुका कार्यकारणी देखील बदलण्यात येतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + nineteen =