You are currently viewing जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा देवगड काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद

जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा देवगड काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद

देवगड :

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक देवगड येथे पार पडली. तालुक्यातील बुथ कमिट्याची यादी जिल्हा काँग्रेसला पाठविण्यात येईल असे तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर यांनी सांगितले. 

सातही जिल्हा परिषद विभागात निरिक्षक नेमून पक्ष वाढीच्या संदर्भात दोन जिल्हापरिषद मतदार संघाची एक अशा बैठका जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत घेण्यात येतील असेही या बैठकीत ठरविण्यात आले. देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पुर्ण ताकदीनिशी उतरणार असून ही निवडणूक फक्त उमेदवार उभे करण्यासाठी नाही तर निवडणुक जिंकण्यासाठी लढवणार असल्याचे मत उपस्थित कार्यकर्त्यांनी मांडले.

या बैठकीस जिल्हा काँग्रेस प्रवक्ते इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम,अॅड.निता गावडे, तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर, जिल्हा सचिव खालिद बगदादी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरेश देवगडकर, शहर अध्यक्ष उमेश कुलकर्णी, माजी तालुका अध्यक्ष नंदकिशोर कांदळगावकर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर, सजाउद्दीन सोलकर, प्रविण मोरे, सुनिल सकपाळ इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − ten =