You are currently viewing नीट परीक्षेसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत स्वतंत्र परीक्षा केंद्र मंजूर

नीट परीक्षेसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत स्वतंत्र परीक्षा केंद्र मंजूर

ना.नारायण राणे केंद्रीय मंत्री होताच शिक्षणाचा बॅकलॉग भरण्यास प्रारंभ

विद्यार्थ्यांना आता कोल्हापूर, मुंबईत परीक्षेसाठी जाण्याची गरज नाही

कणकवली

बारावी नंतरच्या वैद्यकीय शैक्षणिक प्रवेशासाठी महत्वाची असलेली “नीट” परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना यापुढे सिंधुदुर्ग जिल्हयाच्या बाहेर जावे लावणार नाही.केंद्रीय उद्योग मंत्री ना.नारायण राणे यांच्या मागणी नुसार केंद्रीय शिक्षण मंत्री ना.धर्मेंद्र प्रधान यांच्या सूचनेनुसार भारत सरकारच्या शिक्षण विभागाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हयासाठी स्वतंत्र नीट केंद्र जाहीर केली आहेत.

List of NEET Centres at Maharashtra

AKOLA 3102
AMRAVATI 3103
AURANGABAD 3104
BEED 3105
BULDHANA 3106
JALGAON 3107
KOLHAPUR 3108
LATUR 3109
MUMBAI 3110
NAGPUR 3111
NANDED 3112
NASHIK 3113
NAVI MUMBAI 3114
PUNE 3115
SATARA 3116
SOLAPUR 3117
THANE 3118
SANGALI 3119
SINDHUDURG 3120
RATNAGIRI 3121
DHULE 3122

सिंधुदुर्ग 3120,आणि रत्नागिरी 3121 क्रमांकाची दोन केंद्रे महाराष्ट्र राज्यात वाढविण्यात आली आहेत.या पूर्वी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांना ही नीट ची परीक्षा देण्यासाठी कोल्हापूर किंवा मुंबईत जावे लागत होते.आता ही परीक्षा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही केंद्रावरून देता येणार आहे.त्यामुळे विध्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नीट परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हात नाही.त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील उमेश सावंत यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या लक्षात आणू दिले होते. तसा पत्रव्यवहार भारत सरकारच्या शिक्षण विभागाला नामदार नारायण राणे यांनी केला होता.ना.नारायण राणे हे शैक्षणिक सोयी सुविधांसाठी नेहमीच आग्रही असल्याने त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांशी सुद्धा चर्चा करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र नीट केंद्रे दिली जावीत अशी मागणी केली होती.त्यानुसार केंद्र सरकारने ही दोन्ही नीट केंद्रे जाहीर केली आहेत. भारत सरकारचे मंत्री होताच गेल्या अनेक वर्षा पासूनची विध्यार्थी पालकांची मागणी ना.नारायण राणे यांनी सोडविलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − one =