मालवण तहसीलदार यांना जाब विचारत दिले निवेदन
मालवण
मालवण तालुक्यातील डिकवल वांयगवडे या दोन गावांचे रास्त धान्य दुकान स्थलांतर करण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसने हाणून पाडला आहे. यावेळी मालवण तहसीलदार यांना जाब विचारत त्यांना निवेदन देत हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला असे सांगितले आहे.
यावेळी राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापर व उद्योग विभाग तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, मालवण तालुकाध्यक्ष डॉ. साठे, जिल्हा कार्याध्यक्ष व्यापार व उद्योग विभाग हिदायतुल्ला खान, महीला जिल्हाध्यक्ष व्यापार व उद्योग विभाग सौ.दर्शना बाबर देसाई, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, तालुका सदस्य संतोष जोईल पदवीधर महिलाध्यक्ष सदाफ खठखटे, मेनन, अगोस्तीन डिसोजा, मिलिंद घाडगे, सदानंद मालवणकर, बाबू डायस, किरण रावले, सुर्यकांत दाभोलकर आदी उपस्थित होते.