You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न.

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये कला व सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, डी एल एल इ, अर्थशास्त्र विभाग विविध जिल्हास्तरीय, विभागीय, विद्यापीठ,राज्यस्तर व राष्र्टिय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग व प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले तसेच संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डी.टी देसाई, सहाय्यक संचालक एडवोकेट शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. सी ए नाईक, विद्यार्थी प्रतिनिधी आप्पा हीर्लैकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. श्वेतांबरा सावंत ,महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर यांनी केले. त्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 या मध्ये महाविद्यालयाने प्राप्त केलेला स्वायत्त दर्जा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 महाविद्यालयामध्ये लागू झाले, तसेच विभागीय स्तरावर व विद्यापीठ स्तरावर विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली याचा आढावा घेतला.
कला व सांस्कृतिक विभागांमध्ये विद्यापीठ स्तरावर हिंदी स्कीट मध्ये रौप्य पदक, फोक डान्स मध्ये ब्राँज पदक, क्लासिकल म्युझिक हार्मोनियम मध्ये प्रथम क्रमांक , स्टोरी टेलिंग मध्ये उत्तेजनार्थ, स्टोरी रायटिंग, मराठी स्किट, मोनो एक्टिंग तसेच ग्रुप डान्स यामध्ये विद्यार्थिनींनी प्राविण्य मिळवले त्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
क्रीडा विभागामध्ये कोकण विभाग आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेटमध्ये महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला , त्याचबरोबर बास्केटबॉल मध्ये ही संघ विजेता ठरला . हँडबॉल, फुटबॉल, शूटिंग, जुडो या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध स्तरावर विद्यार्थ्यांची निवड झाली. एनसीसी नेव्ही व एनसीसी आर्मी यामध्ये विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. डी एल एल इ च्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या स्ट्रीट प्ले मध्ये महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला. अर्थशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या दीपक पेंडसे हीची अविष्कार स्पर्धेमध्ये निवड. झाली त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. कु. विद्या राजकुमार सावंत हीने महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज जिल्हास्तरीय विजेतेपद मिळवुन मा.जिल्हाधिकारी व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पासाठी एक लाख रूपये बीजभांडवल मिळाले करीता सत्कार करण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मानचीन्ह देऊन करण्यात आला.
सुत्रसंचालन डाॅ.एस ए.देशमुख यानी केले तर आभार डाॅ.यु.सी.पाटील यांनी मानले.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 9 =