You are currently viewing सिंधुदुर्गमध्ये ९ मे ते १५ मे कडक लॉकडाऊन – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गमध्ये ९ मे ते १५ मे कडक लॉकडाऊन – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 9 मे ते 15 मे या काळामध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी यावर सहमती दर्शवली. याचा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

अत्यावश्यक सेवेमध्ये केवळ घरपोच देणे वगळून कोणतेही दुकान उघडे राहणार नाही. मेडिकल सुविधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, व लसीकरणाची मोहीम व माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान यातून वगळण्यात आले आहे. या कडक लॉकडाऊनला सर्वांनीच मदत करावी. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − two =