You are currently viewing *सतोंष बारणे ,  यांना ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ‘  कडून सन्मान*

*सतोंष बारणे , यांना ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ‘ कडून सन्मान*

पिंपरी – मोशी येथील सिल्वर ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्‍टर व महाराष्ट्र किक बॉक्‍सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बारणे यांनी करोना कालावधीत गरजू नागरिकांची दिलेल्या सेवा या कामाची दखल घेऊन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन या संस्थेने ‘स्टार 2020’ हा बहुमान देऊन त्यांना गौरविले आहे.

 

करोनामुळे मार्च महिन्यापासून देशात व राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. अशा परिस्थितीमध्ये सर्व काम धंदा ठप्प झाला होता. अनेक कुटुंबावर आर्थिक व दैनंदिन संकट ओढावले होते. याची तीव्रता लक्षात घेऊन मोशीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संतोष सिताराम बारणे यांनी पिंपरी चिंचवड व आदिवासी परिसरातील गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला.

यामध्ये मोफत अन्नदान व आरोग्य तपासण्यांचे आयोजन केले. आदिवासी व ग्रामीण भागात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून ‘डॉक्‍टर आपल्या दारी’ हा सामाजिक उपक्रम राबविला. यामार्फत अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी व कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरजू नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविली.

 

संतोष सिताराम बारणे मेडिकल व सोशल फाऊंडेशन मोशी, पुणे यांच्यामार्फत डॉक्‍टरांचे एक पथक तयार करून गावोगावी वैद्यकीय सेवा पोहोचविली. रुग्णवाहिकेमध्ये ऑक्‍सिजन पुरवठा किट, ऑपरेशन साहित्य, कार्डिओलॉजी व तपासणीसाठीचे प्राथमिक साहित्य पुरवण्यात आले.

 

रक्‍ताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या सामाजिक कार्याची दखल घेत लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांनी ‘स्टार 2020’ हा बहुमान बारणे यांना दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा