You are currently viewing मालवण शहरात 1 व तालुक्यात 6 ठिकाणी कंटेन्मेंट झोन…..

मालवण शहरात 1 व तालुक्यात 6 ठिकाणी कंटेन्मेंट झोन…..

सिंधुदुर्गनगरी  :

मालवण शहरात धुरीवाडा, मालवण घर क्र. 2220 दिनांक 18 ऑक्टोबर 2020 पर्यंत, तर मालवण तालुक्यात कुसरवे, सावरवाड, घर नं. 874 व 1837 दिनांक 13 ऑक्टोबर 2020 पर्यंत, वरची गुरामवाडी मधिल घर क्र. 565 दिनांक 14 ऑक्टोबर 2020 पर्यंत, वराड, हडपीवाडी, घर क्र. 906,  दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत, मिर्याबांदा, पिरावाडी मधिल घर क्र. 261 दिनांक 16 ऑक्टोबर 2020 पर्यंत, राठवडे, सुतारवाडी, मधिल घर क्र. 37 दिनांक 17 ऑक्टोबर 2020 पर्यंत,   कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोन संबंधित दिनांकापर्यंत रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे  यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + six =