You are currently viewing संदेश पारकर वाढदिवसानिमित्त कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघात कार्यक्रम

संदेश पारकर वाढदिवसानिमित्त कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघात कार्यक्रम

कणकवली

कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना नेते संदेश पारकर यांचा वाढदिवस 14 जुलै रोजी असून या वाढदिवसानिमित्त कणकवली, देवगड, वैभववाडी येथे 12 जुलैपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. वैभववाडी कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालय येथे 12 जुलै रोजी कोरोना योध्दा सत्कार करण्यात येणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती आम. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, अतुल रावराणे, बाळा भिसे उपस्थित राहणार आहेत.

13 जुलै रोजी देवगड तालुक्यात येथे 10 ठिकाणी कोरोना योध्दा सत्कार करण्यात येणार असून यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, अतुल रावराणे, बाळा भिसे उपस्थित राहणार आहेत. 14 जुलै म्हणजेच संदेश पारकर यांच्या वाढदिवसदिनी कणकवली भगवती हॉल येथे सकाळी 9 वाजता रक्तदान शिबीर व गरजूंना छत्रीवाटप, 11 वाजता कोरोना योध्दा सत्कार समारंभ होणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, लोकसभा संपर्कप्रमुख प्रदिप बोरकर, लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, गौरीशंकर खोत, अतुल रावराणे, बाळा भिसे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, गितेश कडू आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी तहसील अधिकारी कर्मचारी, पोलिस अधिकारी कर्मचारी, आरोग्य अधिकारी कर्मचारी, वीज वितरण अधिकारी ,कर्मचारी यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान तसेच गरजूंना छत्री वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवसेना, युवासेना, महिला पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळुन उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, नंदू शिंदे, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, मिलिंद साटम, विलास साळसकर, मंगेश लोके यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 3 =