You are currently viewing सुरेश प्रभू यांनी नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले, सायकल बँक उपक्रम कौतुकास्पद

सुरेश प्रभू यांनी नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले, सायकल बँक उपक्रम कौतुकास्पद

सायकल वाटप कार्यक्रमात डॉ. सुभाष दिघे यांचे प्रतिपादन

मालवण

मानव साधन विकास संस्थेने अनेक समाजपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. सुरेश प्रभू नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत आले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना या सायकलचा उपयोग होईल असे प्रतिपादन डॉ. सुभाष दिघे यांनी केले. विजय केनवडेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. खासदार सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त जनशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानव साधन विकास संस्था संचालित परिवर्तन केंद्र यांच्या संकल्पनेतून कन्या शाळा येथे सायकल बँकचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी डॉ. सुभाष दिघे बोलत होते. यावेळी श्रीपाद शंकर पंतवालावलकर, दिगंबर सामंत, भालचंद्र राऊत, विजय केनवडेकर, नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, भाऊ सामंत, विलास हडकर, महेश मांजरेकर, संदेश कोयंडे, अजय शिंदे, विजय कामत, बबन परुळकेर, लक्ष्मण शिंदे, ज्योती तोरसकर, अनिल चव्हाण, महेश भगत, रत्नाकर कोळंबकर, सौ. साटलकर, प्रभुखानोलकर, यासह शिक्षक तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

यावेळी टोपीवाला हायस्कूल, कन्या शाळा, कुडाळकर हायस्कूल मधील प्रत्येकी १० विद्यार्थी अश्या ३० विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या. यावेळी बोलताना जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग उपाध्यक्ष विजय केनवडेकर म्हणाले, मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांच्याकडे विद्यार्थ्यांसाठी सायकलची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी तात्काळ होकार दिला. ही सायकल पर्यावरणाला उपयुक्त आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यात अशा प्रकारे सायकल देण्यात येणार आहे. आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना या सायकली देण्यात येत आहेत. अशा या सायकल बँक प्रकल्पावर मानव साधन विकास संस्थेने तीन वर्षे काम केलं. महाराष्ट्रातील आणि देशातील पहिली सायकल बँक सुरेश प्रभूंनी सुरू केली.

मानव साधन विकास संस्थेने शाळांना या सायकली दिल्या. त्यानंतर शाळांनी विद्यार्थ्यांची निवड केली त्याच विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. याआधी ८० सायकल ग्रामीण भागात दिल्या होत्या. पुढेही हा प्रकल्प सुरू राहील.

सायकल देणे हे निमित्त आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये मागे रहाणाऱ्या विद्यार्थ्यांना मानव साधन विकास संस्थेमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही विजय केनवडेकर यांनी सांगितले. तर अन्य मान्यवरांनी यावेळी माजी मंत्री खा. सुरेश प्रभू यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 1 =