You are currently viewing बांद्यात माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम…

बांद्यात माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम…

बांदा

बांदा – वाफोली मार्गावरील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त सोमवार १५ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वाजता काकड आरती, अभिषेक व पूजा, सकाळी ९ वा. श्री सत्यविनायक महापूजा, दुपारी १२ वा. गणेशजन्म, त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी भजनाचा कार्यक्रम व रात्री ९ वा. निरवडे येथील अष्टविनायक दशावतार मंडळाचा ‘पावन झाली पुण्यभूमी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गणेश मंदिर सेवा समितीमार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 − 1 =