You are currently viewing वाढत्या महागाई विरोधात २२ जुलै नंतर निदर्शने

वाढत्या महागाई विरोधात २२ जुलै नंतर निदर्शने

महिला काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना निवेदन

ओरोस:

प्रदेशाध्यक्ष नानाभाई पटोले व प्रदेश महिला प्रदेशाध्यक्षा   संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार इंधन दरवाढी व जुलमी केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा  महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी समीर वंजारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी यांना ओरोस येथे निवेदन दिले.

वेंगुर्ले तालुका तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महिला काँग्रेस प्रभारी रूपालीताई सावंत. रत्नागिरी , स्मिता सूर्यकांत वागळे, सावंतवाडी तालुका अध्यक्षा सुंदरवल्लि स्वामि कुडाळ उपस्थित होत्या. २२ जुलै पर्यंत जिल्हा जमाव बंदीचा आदेश जिल्हाधिकारी कें मंजूलक्ष्मी यांनी काढल्यामुळे मोठया प्रामाणात आंदोलन करता आले नाही. येत्या २२ जुलै नंतर निदर्शने करण्यात येणार आहेत. असा इशारा सौ. साक्षी वंजारी यांनी दिला आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − fourteen =