You are currently viewing पावशीत कार व मोटरसायकलमध्ये अपघात : मोटरसायकलस्वार जखमी

पावशीत कार व मोटरसायकलमध्ये अपघात : मोटरसायकलस्वार जखमी

दुभाजकामधून मोटारसायकल बाहेर काढताना झाला अपघात

कुडाळ

मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथे कार व मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार अरुण साबाजी मेस्त्री (वय ५५, रा. पावशी बोरभाटवाडी) हे जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर खाजगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात कार चालक सखाराम खेमा सावंत (रा. रानबांबुळी) यांनी खबर दिली आहे. त्यानुसार मोटारसायकल स्वार अरूण मेस्त्री यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओरोसहून कुडाळच्या दिशेने कार येत होती. त्याचवेळी या कार समोर दुभाजकामधून वळण्यासाठी दुचाकीस्वार अचानक आडवा आला. यात दुचाकी व कार यांच्यात धडक झाली. या दुचाकीला वाचविण्याचा कार चालकाने प्रयत्न केला. परंतु कार दुभाजकावर चढली. या अपघातात दुचाकीस्वार श्री. मेस्त्री (रा.पावशी) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कुडाळ येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले तेथे उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिस ठाण्याचे पोहेकाॅ. रामदास जाधव, डि.डि.माने, श्री.पिरजादे व वाहतूक शाखेचे पोलिस भुतेलो यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या अपघाताची खबर कारचालक सखाराम खेमा सावंत यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 9 =