You are currently viewing नाटळ येथील साईलिला हॉस्पिटलला डेडीकेटड कोवीड हेल्थ सेंटर म्हणून परवानगी

नाटळ येथील साईलिला हॉस्पिटलला डेडीकेटड कोवीड हेल्थ सेंटर म्हणून परवानगी

सिंधुदुर्गनगरी: 

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजनेच्या दृष्टीने जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांना परवानगी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यानुसार डॉ. बी.एस. महाडेश्वर यांच्या साईलिला हॉस्पिटल, नाटळ ता. कणकवली येथे डेडीकेटड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचएसी) म्हणून परवानगी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.

            साईलिला हॉस्पिटलच्या खाटांची संख्या 12 आहे. त्यातील 6 खाटा या डेडीकेटड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचएसी) साठी राखीव असतील. या हॉस्पिटलमध्ये शासनच्या आरोग्य विभागाच्या नियमानुसार उपचार केले जाणार असून कोविड 19 रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी व बिलांची तपासणी करण्यासाठी नियंत्रण अधिकारी नेमला गेला असल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − fifteen =