You are currently viewing महाविकास आघाडी सरकारचा कुडाळ तालुका भाजप कडून निषेध

महाविकास आघाडी सरकारचा कुडाळ तालुका भाजप कडून निषेध

कुडाळ

महाविकास आघाडी सरकारने विधानसभेमध्ये भाजपच्या १२ आमदारांना केलेल्या निलंबनाच्या विरोधात कुडाळ तालुका भाजपने निषेध करून या संदर्भातील निवेदन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांना आज (मंगळवार) दिले.
विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महाविकास आघाडी राज्य सरकारने तालिबानी पध्दतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले असून या कृत्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी कुडाळ तहसिलदारांना आज दिले.

जनतेच्या कोणत्याही प्रश्नांना न्याय न देता भोंगळ व मनमानी पध्दतीने महाराष्ट्र सरकारचा कारभार चालू आहे. लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना असतो, पण लोकशाहीच्या संकेतांचे पालनही या सरकारला करता आलेले नाही. सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये यासाठीच अशोभनीय कृतीचा आधार पळपुट्या सरकारने घेतला आहे, असे या निवेदनात नमूद केले असून जनतेशी कसलेच सोयरसुतक नसलेल्या या महाविकास आघाडीच्या सरकारपर्यंत जसेच्या तसे हे पोहोचवावे, अशीही मागणी मंडळातर्फे अध्यक्ष तुकाराम साईल यांनी या निवेदनात केली आहे.

निवेदन सादर करताना ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक, दादा साईल, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, जेष्ठ नेते राजू राऊळ, कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे, सोशल मीडिया युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजवीर पाटील, तालुका उपाध्यक्ष देवेन्द्र नाईक, तालुका चिटणीस विजय कांबळी, माजी नगरसेवक सुनिल बांदेकर, युवा मोर्चा कुडाळ उपाध्यक्ष चंदन कांबळी, शक्ति केंद प्रमुख राकेश नेमळेकर, निलेश परब, राजू बक्षी, प्रिंतेश गुरव आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =