You are currently viewing ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने देवगड भंडारी समाजाचे तहसीलदारांना निवेदन

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने देवगड भंडारी समाजाचे तहसीलदारांना निवेदन

देवगड

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने इतर मागास वर्ग ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा आदेश दिल्याचे समजते. आमच्या भंडारी समाजाच्या समाजाला ओबीसी 187 याद्वारे शैक्षणिक नोकरी राजकीय संदर्भात आरक्षण दिले जात होते. परंतु सद्यस्थितीत ओबीसी ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केल्याने समाजाला मिळणाऱ्या राजकीय व सामाजिक लाभ नाहीसा झालेला आहे.

त्यामुळे आमच्या भंडारी समाजावर अन्याय होणार आहे तरी सदर बाब शासनाने सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करून आमच्या समाजाला असलेले राजकीय सामाजिक आरक्षण पूर्ववत करावे. अशा आशयाचे निवेदन देवगड तालुका भंडारी समाजाच्या वतीने देवगड तहसीलदार यांना मंगळवारी देण्यात आले आहे . यावेळी नंदकुमार घाटे, प्रदीप मुणगेकर, बाळ खडपे, आप्पा मांजरेकर, हेमंत करंगुटकर,प्रदीप मुणगेकर ,बाबू सावंत, रमाकांत पेडणेकर, वैभव करंगुटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =