You are currently viewing घारपी-उडेलीतील केरळीयनांच्या विरोधात शेतकरी आक्रमक…

घारपी-उडेलीतील केरळीयनांच्या विरोधात शेतकरी आक्रमक…

अतिक्रमण केल्याचा आरोप; कारवाई करा,अन्यथा ३ ऑगस्टला जनआंदोलन करण्याचा इशारा…

सावंतवाडी

घारपी-उडेली येथिल सामायिक जमिनीमध्ये केरळीयन शेतकऱ्यांनी अतिक्रमण करत रस्ते,बंधारे,वीज कनेक्शन घेऊन कच्ची व पक्की घरे बांधली आहेत.त्यामुळे संबंधितांवर तात्काळ करण्यात कारवाई करण्यात यावी,अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे.दरम्यान तात्काळ निर्णय कार्यवाही न झाल्यास ३ ऑगस्टला जनआंदोलन करण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.याबाबत श्री.म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्या मंगळवारी बैठक घेणार असल्याचे श्री.म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी दीपक गावडे, अजय गावडे, गजानन गावडे, रामा गावडे, रमेश गावडे, सुनील गावडे, श्यामसुंदर गावडे, लवू गावडे आदी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी केरळीयन लोकांचे अतिक्रमण आणि सातबारावरील ऑनलाईन आणेवारी त्रुटी बाबत लक्ष वेधले.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, घारपी उडेली येथील सातबारा संगणीकरण झालेले आहेत. मात्र सदर सातबारा नोंदीमध्ये आणेवारी चुकीच्या पद्धतीने नोंद झालेली निदर्शनास येते तर काही अभिलेखात आणेवारी न दाखवता सामाईक नावांची नोंद केलेली आहे. सातबारा ऑनलाइन करणे पूर्वी चावडी वाचन करताना आम्ही हरकती नोंदवल्या असताना सातबारा ऑनलाइन चुकीच्या पद्धतीने केलेले आहे तरी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच घारपी उडेली येथील काही जमिनी केरळी लोकांनी खरेदी केलेली आहे. उडेली येथील जमीन काही लोकांनी विक्री केलेले नाही सदर जमीन सामायिक असून त्या जमिनीवर तसेच ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या गुरूचरण ११० एकर जमीन आमचे देवस्थानचे नावे आहे अशा जमिनीवर केरळी लोकांनी अतिक्रमण करून लागवड केली आहे तसेच विनापरवाना रस्ते, बंधारे, वीज कनेक्शन खांब पुरून संपूर्ण उडेली गावात लाईट घेतलेली आहे सामायिक जमिनीत विक्री न केलेल्या लोकांच्या संमतीशिवाय कच्ची व पक्की घरे बांधली आहेत सदरच्या काही जमिनी खरिपा खाली देखील आहेत असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे
सदर घरे पाडण्यात यावी असा ऑगस्ट २०१८ च्या येथे झालेल्या ग्रामसभेत ठराव घेण्यात आला होता मात्र ग्रामसेवक यांनी परस्पर सदर ठराव बदलून सभा इतिवृत्ता मध्ये बदल केला याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही त्यांनी आजपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही याकडे देखील शेतकऱ्यांनी तहसीलदार म्हात्रे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

उडेली येथील गुरुचरण जमिनीबाबत मोजणी करून घेण्याचे ग्रामपंचायतीला आदेश असूनही त्याबाबत आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही केरळी लोकांना हेतूपुरस्पर ते पाठीशी घालत असल्याने आमच्या सामाईक जमिनीत खरेदी खत झालेल्या क्षेत्रापेक्षा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहे याबाबत योग्य ती कार्यवाही करू करावी अन्यथा उडेली येथील अतिक्रमण केलेल्या केरळी लोकांच्या विरोधात येत्या ३ ऑगस्ट रोजी तीव्र जनआंदोलन करणार आहोत असा इशारा गावकऱ्यांनी तहसीलदार यांना दिला आहे
दरम्यान तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ऑनलाईन सातबारा करताना काही आणेवारी चुकली असेल तर त्यामध्ये बदल केला जाईल तसेच केरळी लोकांच्या जमिनी बाबत जमीन मोजणी करून घेणे क्रमप्राप्त ठरते त्यासाठी उद्या मंगळवारी शिष्टमंडळातील काही पदाधिकाऱ्यांना बोलावून छाननी केल्यानंतर निर्णय घेण्याचे आश्वासन तहसीलदार म्हात्रे यांनी दिले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 13 =