सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1163.26 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 05(1233), सावंतवाडी – 32(1438.10), वेंगुर्ला – 17(932), कुडाळ – 48(1057), मालवण – 42(1163), कणकवली – 04(1262), देवगड – 22(973), वैभववाडी – 04(1248), असा पाऊस झाला आहे.