You are currently viewing मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

या विशेष मोहिमेचा लाभ घ्या : तहसीलदार रामदास झळके यांचे आवाहन

वैभववाडी

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान मतदार यादयांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत वैभववाडी तालुक्यात दिनांक 13 नोव्हेंबर व 14 नोव्हेंबर 2021 तसेच 27 व 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या दिवशी वैभववाडी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) सकाळी 11 ते सायंकाळी 4 वा. पर्यंत उपस्थित राहून फाॕर्म वाटप व फाॕर्म स्वीकारणार आहेत. या विशेष मोहीमेचा लाभ वैभववाडी तालुक्यातील नागरीकांनी घ्यावा. असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार रामदास झळके यांनी प्रसिद्धीपञाद्वारे केले आहे.

निवडणूक आयोगाकडून दिनांक 1 जानेवारी 2022 या दिनांकावर आधारीत छायाचिञासह मतदार यादयांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार दिनांक दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रत्येक मतदान केंद्र व तहसिलदार कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर मतदार यादीत मतदारांनी आपल्या नावाची पडताळणी करावयाची आहे. दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ज्या मुलांची 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा सर्व मतदारांनी नमुना नं.6 फाॕर्म भरणे आवश्यक आहे. किंवा निवडणूक आयोगाच्या nvsp.in या वेबसाईटवर किंवा voter Helpline अॕप या नमुना नं.6 चा फाॕर्म आॕनलाईन भरायचा आहे.

तसेच नावात दुरुस्ती नमुना 8 चा फाॕर्म, स्थलांतरीत किंवा मतदाराचे नाव दुबार असेल तर नमुना क्र.7 चा फाॕर्म भरावा. मतदार मयत असल्यास मृत्यू दाखल्यासह नमुना 7 चा फाॕर्म नातेवाईकांनी भरावा. पत्ता बदलासाठी नमुना 8 अ चा फाॕर्म भरणे आवश्यक आहे. हे सर्व फाॕर्म मतदार केंद्र स्तरीय अधिकारी तसेच तहसिल कार्यालयात निवडणूक शाखेत उपलब्ध आहेत. मतदारांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन रामदास झळके यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा