You are currently viewing माजी सरपंच पप्या तवटे आणि मित्रमंडळी च्या वतीने पावशी उपकेंद्रात आरोग्य सुविधा

माजी सरपंच पप्या तवटे आणि मित्रमंडळी च्या वतीने पावशी उपकेंद्रात आरोग्य सुविधा

पावशी उपकेंद्रात पावशी गावचे माजी सरपंच श्रीपाद उर्फ पप्प्या तवटे आणि त्यांची मित्रमंडळी यांच्या माध्यमातून 4 ऑक्सिमिटर आणि 4 थर्मामिटर तसेच मोठ्या प्रमाणात मेडिसिन उपलब्द करून देण्यात आले.

कुडाळ पंचायत समिती सभापती सौ नूतन आईर, मोहन सावंत, माजी पंचायत समिती सभापती, दादा साईल मंडल अध्यक्ष ओरोस, रुणाल कुंभार ग्रा प सदस्य पावशी, प्रथमेश परब, देवेंद्र सामंत आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पावशी आरोग्य उपकेंद्र आरोग्यसेविका टेमकर मॅडम, कुशे मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

पावशी गावामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले होते. त्यामुळे घरच्या घरी विलगिकरन कशात राहून बरेच जण उपचार घेत होते. अश्या वेळी ऑक्सिजन दररोज तपासणे गरजेचे असते. म्हणजे रुग्णाला स्वतःला स्वतःची काळजी घेणं सोपं ठरत. तसेच ग्रामपंचायत विलगिकरंन कक्षात पण मोठ्या प्रमाणात रुग्ण होते. यांचा ऑक्सिजन तसेच टेम्प्रेचर वेळीच तपासले जावे, रुग्णांना मेडिसिन कमी पडू नये. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन पप्या तवटे आणि त्यांच्या मित्रमंडळींना पावशी गावामध्ये ऑक्सिमीटर, थर्मामिटर तसेच कोरोनासाठी लागणारी मेडिसिन उपलब्द करून दिलीत. पुन्हा एकदा सत्ता नसताना पण गावाचे पालकत्व करत असल्याचे सिद्ध झाले. वेळोवेळी लोकांना मदत करणे हा पिंडच त्यांचा असल्याने पावशी गावात सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 3 =