You are currently viewing पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी तुषार देसाई

पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी तुषार देसाई

दोडामार्ग

‘नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत’ या संस्थेच्या दोडामार्ग तालुका अध्यक्ष पदी केर येथील तुषार देसाई यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष पदी दोडामार्ग शहरातील राजाराम फर्जंद तर महिला तालुका अध्यक्ष पदी साटेली – भेडशी येथील नेहा ठाकूर यांचीही निवड झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील सुयोग धस हे या संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष असून जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे हे या संस्थेचे मार्गदर्शक आहेत. ‘पर्यावरणाचे रक्षण हे देशाचे सरंक्षण’ हे या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. या संस्थेच्या वरिष्ठ कार्यकरणीची नुकतीच बैठक झाली व त्यामध्ये दोडामार्ग तालुक्यासाठीच्या या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. पर्यावरण क्षेत्रात या व्यक्तींनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन ‘नेफडो’ च्या अंतर्गत पर्यावरण प्रेमी या नात्याने ही निवड करण्यात आली आहे. संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील, महिला जिल्हाध्यक्षा संजना गवस, कोंकण विभागाचे अध्यक्ष प्रकाश कदम, व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक भवर यांच्यासहित दोडामार्ग तालुक्यातील अनेक मान्यवरांनी या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =