तळवडे बाजारपेठेतील रस्त्यालगतचे अनधिकृत बांधकाम हटवा

तळवडे बाजारपेठेतील रस्त्यालगतचे अनधिकृत बांधकाम हटवा

सचिदानंद बुगडे यांचे बांधकाम विभागाला निवेदन

सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावरील तळवडे बाजारपेठेतुन जाणाऱ्या रस्त्यालगतचे गटार बुजवून बांधकाम केले गेल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे बाजारपेठेत पाणी साचते आणि वाहतुकीच्या कोंडीलाही सामोरे जावे लागते. याकडे सावंतवाडी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सच्चिदानंद मधुकर बुगडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे.
याबाबत तळवडे ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले होते मात्र ग्रामपंचायतीने दखल घेतली नाही.
गटारावरच सिमेंटचे पक्के बांधकाम व इमारत उभारण्यात आल्याने तेथील रिक्षा व्यावसायिकांनाही अडचण होत आहे. व्यापारी वर्गालाही त्रास होतो. तरी त्वरित अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे अशी मागणी बुगडे यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदनही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा