You are currently viewing पेंडूर खरारे येथे झाड पडून घराचे नुकसान

पेंडूर खरारे येथे झाड पडून घराचे नुकसान

आ.वैभव नाईक यांनी भेट देऊन केली मदत

तौक्ते चक्रीवादळामुळे पेंडूर खरारे टेंबवाडी येथील शुद्धमती सदाशिव सावंत यांच्या राहत्या घरावर झाड पडून नुकसान झाले. यामध्ये घराचे पूर्णतः नुकसान झाले असून आज आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पंचनाम्याबाबत माहिती घेत नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव करण्यास सांगितले.
तसेच आमदार वैभव नाईक यांनी शुद्धमती सावंत यांना छप्परासाठी २५ सिमेंट पत्रे व ताडपत्रीची मदत पुरविली. शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी विष्णू लाड, डॉ. गोपाळ सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 16 =