You are currently viewing ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट थकीत बिला संदर्भात १५ दिवसांत निर्णय

ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट थकीत बिला संदर्भात १५ दिवसांत निर्णय

तोपर्यंत वीजबिल वसूली थांबविण्याच्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वीज वितरणला सूचना

​​आ. वैभव नाईक यांची माहीती

​ ​ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटच्या थकीत बिलाबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून ग्रामविकास विभागामार्फत स्ट्रीट लाईटची थकीत बिले भरण्याची मागणी केली आहे. ग्रामविकास विभागाने ग्रा.प. ना १५ वा वित्त आयोगमधून ही थकीत बिले भरण्याच्या सूचना दिल्या आहेत, मात्र ग्रामपंचायतींचे एवढे उत्पन्न नसल्याने ही बिले भरणे ग्रामपंचायतींना श​क्य​ नाही.​ ​दरवर्षी ग्रामविकास विभागामार्फत स्ट्रीट लाईटची बिले भरली जातात याकडे आ. वैभव नाईक यांनी मुश्रीफ यांचे लक्ष वेधले.
आ.​ ​वैभव नाईक यांच्या मागणीची दखल घेऊन ना.​ ​हसन मुश्रीफ यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करून ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटची किती बिले थकीत आहेत याचा अहवाल १५ दिवसांत ग्रामविकास विभागाकडे देण्याच्या सूचना दिल्या आहेत.​ ​तोपर्यंत ग्रामपंचायतींकडे थकीत बिलासाठी तगादा लावू नये, वी​ज कनेक्शने देखील कट करू नये.​ ​अशा सूचना वीज वितरण विभागाला देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटच्या थकीत बिला संदर्भात १५ दिवसात पुढील निर्णय होणार असल्याची माहिती कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा