माणगाव येथे बचतगटांना ७ हजार हळद रोपांचे वाटप
यांत्रिकीकरणामुळे शेतीचे आधुनिकीकरण झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक एकात्मिक पद्धतीने शेती करून उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. चांदा ते बांदा, कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ माणगाव विभागाला जास्त प्रमाणात झाला आहे. अशाच प्रकारे शासनाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ शेतकरी व नागरिकांनी घ्यावा. राज्य सरकारच्या माध्यमातून . येथील विकास कामे देखील मार्गी लावली जात आहेत. जिल्ह्यात आरोग्याच्या दृष्टीने सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत.अजूनही दर्जेदार आरोग्य सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषिदिन व कृषि संजीवनी सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमा निमित्ताने माणगाव येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) अंतर्गत बचत गटांना ७ हजार हळद रोपांचे वाटप करण्यात आले.मौजे तुळसुली तर्फ माणगाव येथील दामिनी शेतकरी बचत गट, पावणाई शेतकरी बचत गटांना याचा लाभ देण्यात आला.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, ठाकरे सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामे शिवसैनिकांनी ग्रामस्थांपर्यंत पोचविली पाहिजेत. येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत त्यादृष्टीने आतापासूनच काम झाले पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना अभिप्रेत असे काम सर्वांनी करावे. आ. वैभव नाईक, आ. दीपक केसरकर यांचे मतदारसंघात उत्तमरीत्या काम सुरु आहे.असे त्यांनी सांगत. शेतकऱयांनी शेतीतून अधिकाधिक उत्पन्न घेऊन आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन केले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, चांदा ते बांदा, कृषी यांत्रिकीकरण योजेनमुळे जिल्ह्यात भात शेतीचे उत्पन्न वाढले आहे. याचे श्रेय आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक यांनाच जाते. कुडाळ मध्ये आ. वैभव नाईक यांनी या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला. भाताला दर मिळवून दिला. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे ठरत आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर जि. प. गटनेते नागेंद्र परब, जि. प. सदस्य अमरसेन सावंत, राजू कविटकर, पं. स. कुडाळ उपसभापती जयभरात पालव, अतुल बंगे,विकास कुडाळकर,हरी खोबरेकर, प्रगतशील शेतकरी श्री. विष्णू ताम्हाणेकर, तालुका कृषि अधिकारी रमाकांत कांबळे, मंडळ कृषि अधिकारी श्रीम. मोहिनी वाळेकर, कृषि सहाय्यक प्रशांत कुडतरकर, सचिन मोरे, ऍंथोनी डिसोझा, धनंजय कदम आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.