You are currently viewing संतांची शिकवण आचरणात आणून राज्य स्वच्छ व कोरोना मुक्त करुया – मुख्यमंत्री

संतांची शिकवण आचरणात आणून राज्य स्वच्छ व कोरोना मुक्त करुया – मुख्यमंत्री

कुशेवाडा ग्रामपंचायत स्वच्छतेत राज्यात तिसरी

 सिंधुदुर्गनगरी 

आपल्या महाराष्ट्रला संताची परपंरा आहे. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा वसा दिला आहे. हेच स्वच्छतेचे कार्य पुढे नेण्याचे काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जेथे जिद्द व निश्चय असता तेथे यश नक्की मिळते त्यामुळेच हागणादारी मुक्त महाराष्ट्राप्रमाणे कोरोना मुक्त महाराष्ट्र नक्की होईल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2017-18 या बक्षिस वितरण सोहळा आज ऑनलाईन पध्दतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला.कार्यक्रमांस उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील, ऑनलाईन च्या माध्यमातुन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सभापती पंचायत समिती वेंगुर्ला  अनुश्री काबंळी,स्नेहा राऊळ, सरपंच कुशेवाडा ग्रामपंचायत, श्रीपाद पाताडे कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा,विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता),निलेश सामंत उपसरपंच कुशेवाडा ग्रामपंचायत  आदी मान्यवर उपस्थित होते.

   संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2017-18 मध्ये जिल्हातील कुशेवाडा ग्रामपंचायतीने राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला होता. या पारितोषिकाचे ऑनलाईन पध्दतीने आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्रजित नायर शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तृतीय क्रमांक विजेत्या ग्रामपंचायतीस रक्कम रुपये 15 लक्ष  चा दधनादेश,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र  देऊन गौरविण्यात आले. या अभियानात प्रथम क्रमांक ग्रामपचायत अनवखेड ता. दिडोरी जिल्हा नाशिक, व्दितीय क्रमांक ग्रामपंचायत लोणी बु, ता. राहता जिल्ह अहमदनगर यांनी पटकाविला आहे. तर ग्रामपंचायम कान्हेवाडी तर्फ चाकण ता. खेड जिल्हा पुणे यांना स्व. वंसतराव नाईक पुरस्कार (पाणी गुणवत्ता पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्र), गामपंचायत पारकुडी ता. व जिल्हा गडचिरोली यांना स्व. आबासाहेब खेडकर स्मृती  पुरस्कार (कुटंब कल्याण क्षेत्र) ग्रापंचायत चादोरे ता. माणगाव जिल्हा रायगड डॉ. बाबासाहेब आबेडकर पुरस्कार (सामाजिक एकता) असे विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

  स्वच्छतेसाठी श्रमदान , लोकसहभाग, माध्यमातुन स्व,आर.आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही लोकचळवळ उभी केली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कारामुळे राज्यातील गावे स्वच्छ होण्यास नक्कीच मदत झाली आहे. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमांत सर्वानी सहभागी घेऊन स्वच्छतेत सातत्य राखने गरजेचे आहे. यांमुळे सर्वाचेच आरोग्यमान सुधारण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =