You are currently viewing मुख्याध्यापक संजय जाधव यांनी वाढदिनी जपली सामाजिक बांधिलकी

मुख्याध्यापक संजय जाधव यांनी वाढदिनी जपली सामाजिक बांधिलकी

बांदा

जिल्हा परिषद मडुरा नं. 3 शाळेतील मुख्याध्यापक श्री संजय तुकाराम जाधव यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील
शेर्ले येथील डिवायीन मर्सी येथील कोवीड सेंटरमधील पेशंटना अंडी, फळे, मास्क, सॅनिटायझर या साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला.
यावेळी मडुरा गावचे तलाठी विजय कविटकर, मडुरा नं 2 शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदिप निऊंगरे, प्राथमिक शिक्षक श्री.आनंद कोळापटे, श्री.सचिन मानकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.संजय जाधव यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करून कोवीड सेंटरला दिलेल्या या मदतीबद्दल कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + thirteen =