You are currently viewing राज्यस्तरीय बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धा…..

राज्यस्तरीय बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धा…..

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्‍छता या विषयाच्या अनुषंगाने बोधचिन्ह व बोधवाक्य तयार करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश जोंधळे यांनी दिली.

            राज्यस्तरीय बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धेसाठी स्पर्धकांनी ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामीण स्वच्छता या विषयावर बोध होईल असा लोगो तयार करुन पाठविण्यात यावा. ब्रीदवाक्य मोजक्य शब्दात व मराठीतून असणे आवश्यक आहे. बोधचिन्ह एकरंगी, बहुरंगी असावे. सहभागी स्पर्धकांनी लोगोची सॉफ्ट कॉपी पाठविणे महत्वाचे आहे. स्पर्धकांनी स्वत:चे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आदी माहिती देणे आवश्यक आहे.  लोगोची अंतिम निवड करण्यात येईल, त्यांना कलर फाईल उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. लोगोची अंतिम निवड करण्याचा संपूर्ण अधिकारी राज्य पाणी  व स्वच्छता मिशनला राहणार आहे.

            स्पर्धकांनी लोगोची सॉफ्ट कॉपी directorwsso@gmail.com व iecwsso@gmail.com या मेल आयडीवर पाठविण्यात यावी. बोधचिन्ह व बोधवाक्य यांची अंतिम निवड झालेल्या स्पर्धकांना रक्कम रु. 50,000/- (पन्नास हजार फक्त) देऊन गौरविण्यात येणार आहे.  या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवार दि. 30 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील कलाकार, विद्यार्थी व जाहिरात संस्था यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =