You are currently viewing रास्त धान्य दुकानातील निकृष्ट दर्जाचा माल स्वीकारु नका : पुंडलिक दळवी

रास्त धान्य दुकानातील निकृष्ट दर्जाचा माल स्वीकारु नका : पुंडलिक दळवी

सावंतवाडी

कोरोनाच्या काळात शासनाकडून सर्वसामान्य जनतेस मोफत धान्य वितरीत केले जात. मात्र, हे धान्य मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा खळबळजनक प्रकार मडुरे येथे उघडकीस आला होता.याबाबत संबंधित ग्राहकांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर काल त्यांनी सावंतवाडी गोदामाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र, गोदामातील धान्य चांगल्या प्रतीचे निघाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष, सावंतवाडी तालुकाध्यक्ष, दक्षता समिती सदस्य पुंडलिक दळवी यांनी आज या गोदामाला भेट देत पहाणी केली. प्रत्यक्ष पहाणी केली असता गोदामातील धान्य चांगल्या प्रतीचे असल्याच निदर्शनास आले.

यावेळी रास्त धान्य दुकानात चांगल्या प्रतीच धान्य न मिळाल्यास ग्राहकांनी ते नाकाराव, अशा प्रकारचा माल न स्वीकारता तो राशन धान्य दुकानदारास परत करावा‌ असं आवाहन पुंडलिक दळवी यांनी केले. तर शहरातील काही रास्त दुकानांना भेट देत त्यांनी धान्याची पहाणी केली. यावेळी रास्त धान्य वितरकांनी अशा प्रकारचा माल रेशन धारकांना वितरीत न करता असा माल गोदमास परत करावा अशा सुचना रास्त धान्य दुकानदारांना दिल्या. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, संतोष जोईल, हिदायतुल्ला खान आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 1 =