You are currently viewing प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत रोजगाराची संधी

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत रोजगाराची संधी

सिंधुदुर्गनगरी

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA) अंतर्गत “मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्यास इच्छूक असलेल्या जिल्हयातील युवक – युवतींसाठी हेल्थकेअर, मेडिकल व नर्सिंग व डोमेस्टिक वर्कर क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

         या योजनेअंतर्गत जिल्हा रुग्णालय,सिंधुदुर्ग व राणी जानकीबाईसाहेब वैद्यकिय संस्था, रुग्णालय यांना महाआरोग्य अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. जिल्हयातील उमेदवार हेल्थकेअर सेक्टरमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यास इच्छूक आहेत, अशा उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपली अनुमती https://forms.gle//M5ZeYjHRJsxbtN9s7 या लिंकवर क्लिक करुन गुगल फॉर्म भरुन नोदवावी. प्रशिक्षण सुरु होण्यापूर्वी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करुन  ईमेल,दूरध्वनीव्दारे याबाबत उमेदवारांना कळविण्यात येईल.

       नोंदणी करण्यास अडचणी येत असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग दुरध्वनी क्रमांक 02362-228835, मोबाईल क्रमांक 09403350689 ईमेल आयडी sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =