दहावी व बारावीच्या ऑक्टोबर फेरपरीक्षा दिवाळीनंतर..

दहावी व बारावीच्या ऑक्टोबर फेरपरीक्षा दिवाळीनंतर..

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीकर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबर फेरपरीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या परीक्षा दिवाळीनंतरच होण्याची शक्यता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

‘या परीक्षा सर्वसाधारण परिस्थितीत ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येतात. पण यंदा राज्यावर करोनाचं साकट असल्याने या परीक्षा नोव्हेंबर किंवा कदाचित डिसेंबरपर्यंतही लांबणीवर पडतील,’ असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा