सिंधुदुर्गनगरी :
मालवण वराड येथील प.पू.बाबा महाराज परुळेकर यांनी आज सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान देह ठेवला. त्यांचे वय 82 होते.
गेली पन्नास वर्षे लोकांना आध्यात्मिक दृष्टया मार्गदर्शन, अडचणीत असणाऱ्या लोकांना आधार देण्याचे काम त्यांनी केले होते. स्वतः अंध असूनही त्यांनी अनेक पददलितांना आधार दिला होता.बाबांना आज त्यानच्या कुसरवे येथील मठात समाधिस्त करण्यात आले.त्यांचा मोठा भक्त परिवार महाराष्ट्र व गोव्यात आहे.
परुळेकर महाराजांचा जन्म वराड येथे झाला होता. त्यांना चार भाऊ व सहा बहिणी आहेत .त्यांनी आपल्या मठात अनेक दिव्यांग,मानसिक दृष्ट्या कमकुवत लोकांना आसरा दिला होता. सुप्रसिद्ध वकील रुपेश परुळेकर यांचे ते सख्खे काका होत.