You are currently viewing युवा परिवर्तन संस्थेकडून बॅ. नाथ पै कोविड केअर सेंटरला वैद्यकीय उपकरणांची मदत

युवा परिवर्तन संस्थेकडून बॅ. नाथ पै कोविड केअर सेंटरला वैद्यकीय उपकरणांची मदत

कुडाळ :

युवा परिवर्तन ही संस्था संपूर्ण भारत देशांमध्ये काम करत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ३ हजार पेक्षा जास्त लोकांना NSDC चे प्रशिक्षण देऊन अनेक लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे. शिक्षण संस्था ही युवा परिवर्तन ची पार्टनर असून नर्सिंग असिस्टंट ऑपरेशन थेटर मॅनेजमेंट यासारखी प्रशिक्षण सातत्याने आयोजन करीत आहे. महाराष्ट्र मध्ये पोलादपूर, मातृमंदिर देवरुख या ठिकाणी सुद्धा कोविड सेंटरला उपकरणांच्या वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गरजूंना धान्य वाटपाचे सुद्धा काम सुरू आहे.

युवा परिवर्तन या संस्थेच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर ला ५ लाख रुपयाचे वैद्यकीय उपकरणे वाटप करण्यात आली.

यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर २, ऑक्सीजन सिलेंडर २, ऑक्सी मीटर १५, PPE.KIT २००, मास्क ५००, असे जवळजवळ ५ लाखाचे साहित्य देण्यात आले. त्यावेळी युवा परिवर्तन चे एरिया मॅनेजर दत्तात्रय परुळेकर, समन्वयक दीपक कुडाळकर, विवेक नाईक, दत्तप्रसाद पाटकर, त्याचप्रमाणे नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य कल्पना भंडारी व सहकारी स्टाफ  उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =