जनतेसाठी मनसेचा सामाजिक बांधिलकीचा घंटानाद

जनतेसाठी मनसेचा सामाजिक बांधिलकीचा घंटानाद

कोरोना महामारीत जिल्हयातील अनेक जणांचे बळी गेले. जिल्ह्यातील अनेक संसार उध्वस्त झाले. अनेक मुलं पोरकी झाली आहेत. ना ना प्रकारे झळ नागरिकांना बसली आहे. बसत आहे. सरकारी रुग्णालयात आवश्यक असलेली पुरेशी सामुग्री, बेड उपलब्ध नसल्यामुळे, रुग्णसंख्या दिवसांगाणिक वाढत असल्याने शासनाने काही खाजगी रुग्णालयाना कोविड केंद्र चालऊन महामारीला आळा घालण्यासाठी हातभार लावण्याच्या दृष्टीने परवानगी दिली. जिल्ह्यातील काही ठरविक तालुक्यामध्ये ही खाजगी कोविड केंद्र चालु आहेत.
या खाजगी कोविड केंद्रांना कोरोना रुग्ण तपासणी, उपचार याबाबत शासकीय दर ठरविण्यात आले आहेत.तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देखील कोरोना रुग्णांच्या उपचारापोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसा शासन निर्णय पारीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील संबंधित शासकीय यंत्रणा मात्र सुशेगात असुन या कोरोना रुग्ण उपचारात सरकारने ठरवून दिलेल्या दराची अंमलबजावणी होते का नाही…? महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णांना लाभ दिला जातो का..? याबाबत कोविड केंद्राना भेटी देऊन तपासणी करायला हवी होती. ती झालेली नाही.

खाजगी कोविड केंद्रात कोरोना रुग्णांच्या उपचारापोटी आवाजवी बिले आकारून रुग्णांची आर्थिक महामारी होत असल्याने, रुग्णांना उपचार केलेली फाईल दिली जात नाही.रुग्ण लाभार्थी असूनही महात्मा जन योजनेचा लाभ दिला जात नाही.कणकवली पोलीस ठाण्यात दोन दिवसापूर्वी मृत रुग्णाच्या नातेवाईकांने एका खाजगी केंद्रा विरोधात रितसर तक्रार दाखल केलेली आहे. आमच्याकडे देखील काही लेखी तक्रारी आल्या आहेत.कोरोना रुग्णांनायोजनेचा लाभ व रुग्णाच्या उपचारापोटी सरकारी दरा व्यतिरिक्त जादा आवाजवी आकारलेली रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना परत करा. मनसेच्या या प्रमुख मागणीसाठी हे घंटानांद आंदोलन आहे.

या घंटानांद आंदोलनात जिल्ह्यातील सामाजिक संस्था, समाजसेवक यांनी पाठिंबा द्यावा, सहभागी व्हावं .आमचं जनतेला आवाहन आहे बिनदिक्कत आपल्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिकांकडे द्या.महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणास न्याय देण्यास कठीबद्ध आहे
या घंटानाद आंदोलन स्थळी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आल्याशिवाय हा घंटानांद थांबणार नाही.जनतेसाठी मनसेचा हा सामाजिक बांधिकीचा घंटानांद कायम असाच घुमणार..

प्रतिक्रिया व्यक्त करा