You are currently viewing तिलारीत कुत्र्याची शिकार करताना बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू..…

तिलारीत कुत्र्याची शिकार करताना बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू..…

दोडामार्ग

तिलारी येथील केशव शेट्ये यांच्या शेत जमिनीलगत असलेल्या विहिरीत काल रात्रीच्या सुमारास कुत्र्याची शिकार करताना बिबट्या विहिरीत पडला असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभाग अधिका-यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. आज सकाळी गजानन पानपट्टे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्या बिबट्याला बाहेर काढले. तो बिबट्या मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहिती फॉरेस्ट ऑफिसर गजानन पानपट्टे यांनी दिली

 

कुत्र्याच्या मागावर असलेला बिबटय़ा थेट विहीरीत कोसळल्याने त्याच्यासह कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना तिलारी वसाहत परिसरात घडली आहे. हा प्रकार कळताच स्थानिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. तर वनविभाग अधिका-यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. ही घटना आज सकाळी साडे नऊ वाजता उघड झाली. दरम्यान पाण्यात पोहताना दमल्याने बिबट्यासह कुत्र्याचा मृत्यू झाला असावा,असा प्राथमिक अंदाज वन अधिकारी गजानन पानपट्टे यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 8 =