You are currently viewing तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी रविवारी शिबिर

तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी रविवारी शिबिर

लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

तृतीयपंथी व्यक्तींना तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी रविवार दिनांक  29 मे रोजी सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ओरोस येथे एक दिवसीय शिबीराचे आयोजन केले आहे.   तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवून लाभार्थ्यांने शिबिराला उपस्थित राहून नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.

                तृतीयपंथी समाजाला शासनाकडून लाभ देण्यासाठी तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण करण्याबाबत शासनाने आदेशित केले आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण व कौशल्य विकासाचा योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे.  त्या अनुषंगाने  तृतीयपंथी व्यक्तींना तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी रविवार दिनांक  29 मे रोजी सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ओरोस येथे एक दिवसीय शिबीराचे आयोजन केले आहे.   तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवून लाभार्थ्यांने शिबिराला उपस्थित राहून नोंदणी करुन घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा