जिल्ह्यात 1 लाख 99 हजार 737 जणांनी घेतला पहिला डोस

जिल्ह्यात 1 लाख 99 हजार 737 जणांनी घेतला पहिला डोस

 सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 99 हजार 737 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 9 हजार 757 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 922 जणांनी दुसरा डोस घेतला.  9 हजार 512 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 867 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 82 हजार 988 व्यक्तींनी पहिला डोस तर 25 हजार 710 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 77 हजार 269 नागरिकांनी पहिला डोस तर 9 हजार 516 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 20 हजार 211 जणांनी पहिला डोस तर 6 हजार 205 व्यक्तींनी दुसरा डोस  घेतला आहे. असे एकूण 2 लाख 52 हजार 957 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 2 लाख 44 हजार 460 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 85 हजार 580 लसी या कोविशिल्डच्या तर 58 हजार 880 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 95 हजार 705 कोविशिल्ड आणि 57 हजार 252 कोवॅक्सिन असे मिळून 2 लाख 52 हजार 957 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 3 हजार 200 लसी उपलब्ध असून त्यापैकी 680 कोविशिल्डच्या आणि 2 हजार 520 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 640 लसी शिल्लक असून त्यापैकी 540  कोविशिल्ड आणि  100  कोवॅक्सीनच्या लसी  शिल्लक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा