You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील आठ जणांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश

वैभववाडी तालुक्यातील आठ जणांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश

जिल्हा युवक काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती

वैभववाडी
राष्ट्रीय काँग्रेस पक्षात वैभववाडी तालुक्यातील आठ जणांनी जाहीर प्रवेश केला आहे. वैभववाडी युवक काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र जाधव, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आनंद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही प्रवेश प्रक्रिया पार पडली आहे.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा प्रवेश घेण्यात आला.

यावेळी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, चिटणीस बाळू अंधारी, जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, भालचंद्र जाधव, आनंद पवार, जिल्हा उपाध्यक्ष पल्लवी तारी, लता कुबल- मोंडकर, मधुकर पाटेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा