You are currently viewing वीजेचा लपंडाव आणि बिलांची तफावत – मालवणात मनसे आक्रमक

वीजेचा लपंडाव आणि बिलांची तफावत – मालवणात मनसे आक्रमक

देवबाग, सर्जेकोट, तारकर्ली येथील मनसैनिकांचे वीजवितरणला निवेदन..!

मालवण तालुक्यात तारकर्ली,देवबाग व सर्जेकोट या व अश्या अनेक गावांमध्ये वीजेचा अनियमितपणा चालू होता तसेच दोन ते तीन तासांनी वीज जाण्याचे प्रमाण देखील अधिक आहे.त्याबरोबर आलेल्या वीज बिला मध्ये देखील खूप तफावत आहे.अनेक नागरिकांना वाढीव युनिट आले आहे.सदर प्रश्नांवर येत्या ८ दिवसात योग्य तो तोडगा काढावा यासाठी देवबाग,सर्जेकोट,तारकर्ली येथील मनसैनिकांनी आज मालवण येथील वीजवितरण कार्यालयात निवेदन देत मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा इशारा दिला.

निवेदनात म्हटले आहे की दिवसातून ३ ते ४ तास वीजपुरवठा खंडित होतो.पाऊस,वारा नसताना अश्या प्रकारे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे घरगुती उपकरणे निकामी होण्याचा संभव आहे.सध्या कोरोना स्थितीमुळे ऑनलाइन अभ्यास करणारे विद्यार्थी वर्क फ्रॉम होम करणारे नागरिक यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.वीज पुरवठा दिवसातून वारंवार खंडित होवूनही वीज बिल जास्त येत का येत आहे.असा प्रश्न उपस्थित केला.

यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री.साखरे यांनी लवकरच वीजपुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिले तसेच वाढीव आलेली वीजबीलांची तपासणी केली जाईल असे संगितले.यावेळी मनविसे मालवण शहरअध्यक्ष साईराज चव्हाण,मनविसे सर्जेकोट-कोळंब विभागअध्यक्ष जनार्दन आजगांवकर, महाराष्ट्र सैनिक निखिल गावडे ,मनसे सर्जेकोट शाखाध्यक्ष वैभव आजगांवकर,मनविसे सर्जेकोट शाखाध्यक्ष वृषभ आजगांवकर,मनसे देवबाग विभागअध्यक्ष बजरंग कुबल,मनसे तारकर्ली शाखाध्यक्ष प्रसाद बापर्डेकर,मनमोहन केळुसकर,मनविसे तारकर्ली-देवबाग विभाग अध्यक्ष प्रतिक कुबल,महाराष्ट्र सैनिक अक्षय पाटील,सुशील चव्हाण,मिलिंद तेली ,सदानंद सातार्डेकरआदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा