You are currently viewing मुंबईला पाठवण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये प्रचंड भ्रष्टाचार –  जेडी नाडकर्णी

मुंबईला पाठवण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये प्रचंड भ्रष्टाचार – जेडी नाडकर्णी

कोविंड च्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधून एसटी महामंडळाने बेस्टच्या बसेस, कमी पडत असल्यामुळे प्रवाशांसाठी, बसेस पाठविला गेल्या होत्या. सदर बसेस वेगळ्यावेगळ्या महाराष्ट्राच्या डेपोमधून मागवण्यात आल्या होत्या. कोविड च्या महामारी मध्ये जिवाची पर्वा न करता एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर व कंडक्टर यांनी ती सेवा बजावली. काही चालक व वाहक यांना जबरदस्तीने सदर काम बजावण्यासाठी निलंबनाची कारवाई ची धमकी देऊन पाठवण्यात आले होते.

सदर सेवा बजावण्याच्या वेळेस राहण्यामध्ये व त्यांना दिल्या गेलेल्या जेवणामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेला वाटत आहे.  व सदर सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवण्यात आली होती, पण सहा महिने होऊन सुद्धा जाणीवपूर्वक सदर गोष्टी लपवण्यात येत आहेत असा गंभीर आरोप करण्याची वेळ आली आहे.

हे सदर भ्रष्टाचारामध्ये जे जे लोक सामील आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी परिवहन मंत्री तसच मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदना मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी दिली  आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =