You are currently viewing पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, दिडशे जणांविरुद्ध गुन्हा

पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, दिडशे जणांविरुद्ध गुन्हा

 

आपल्याविषयी पोलिसांना खबर देतो, असे सांगत शंभर ते दिडशे जणांच्या जमावाने पोलिस कर्मचाऱ्यांवर बांबु, विटा व सिमेंटच्या ब्लॉकने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमध्ये पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात 27 जणांसह दिडशे जणांविरुद्ध गुन्हा सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हि घटना मंगळवारी रात्री पावणे आठ वाजता वारजे माळवाडी येथील म्हाडा कॉलनीमध्ये घडली.

याप्रकरणी श्रीकांत दगडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दगडे हे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी पथकामध्ये नेमणूकीस आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी ऋषिकेष कोळप हे दोघेजण वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी फिर्यादीला एका बातमीदाराने दिलेल्या बातमीची शहानिशा करण्यासाठी दोघेजण मंगळवारी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडी येथील म्हाडा कॉलनीमध्ये गेले होते. त्यावेळी म्हाडा कॉलनी क्रमांक एक व दोन येथे ते एका व्यक्तीशी बोलत होते. तेव्हा, संबंधीत इमारतीमधील महिला व पुरूष तसेच त्यांचे 125 ते 150 साथीदार फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्याच्या जवळ आले. त्यांना “धीरज डोलारे हा आपल्याविषयी पोलिसांना माहिती देतो, याला जीवंत सोडायचा नाही. त्याला संपवून टाकायचा’ अशी धमकी देत दगड, बांबू, स्टंप व सिमेंटचा ब्लॉक घेऊन फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांना गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मारहाण करणाऱ्यांना फिर्यादी व त्यांचे सहकारी हे “आम्ही गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी आहोत, आम्ही आमचे सरकारी कामकाज पार पाडत आहोत.तुम्ही सरकारी कामात अडथळा निर्माण करू नका’ असे वारंवार बजावून सांगितले. त्यानंतरही जमावाने दोघांना जबर मारहाण केली. या हल्ल्यामध्ये फिर्यादी व त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =