प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधू पोलिसांच्या ताब्यात

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधू पोलिसांच्या ताब्यात

आणखी एका नामांकित बिल्डरला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. परांजपे बंधूंना फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांनी बिल्डर अमित लुंकडला दोनच दिवसांपुर्वी अटक केली आहे. बिल्डर अमित लुंकड सध्या येरवडा जेलमध्ये आहे. दरम्यान, पुण्यातील प्रसिध्द अशा परांजपे बिल्डर बंधूनां मुंबई पोलिसांनी पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे (वय) 59) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वसुंदरा डोंगरे यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सीआर नं. 492/2021 कलम 476, 467, 68, 406, 420 व 120 (ब) कलमानव्ये गुन्हा नोंदविलेला आहे.

फिर्यादीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. याबाबत आज दुपारी विलेपार्ले पोलीस ठाण्यात खोटेदस्त बनवून तसेच विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल केला. त्या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या बाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता कोणीही बोलण्यास नकार दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा