You are currently viewing महेश सेवा समितीतर्फे ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार 

महेश सेवा समितीतर्फे ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार 

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

येथील महेश सेवा समितीच्या वतीने सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार प. पू.श्री श्री 1008 जगदगुरु रामानुजाचार्य स्वामी श्रीधराचार्य महाराज यांच्या हस्ते व खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष नंदकिशोर भुतडा यांनी केले.

सदर प्रसंगी श्री श्रीधराचार्य महाराज यांनी महेश सेवा समितीच्या कार्याचा गौरव करून माहेश्वरी समाजाने समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करून पुण्य काम केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना पुढील जीवनात वाटचाल कशी करावी आणि आपले आयुष्य आनंदी कसे जगावे, याचे मौलिक मार्गदर्शन केले.

यावेळी खा.धनंजय महाडिक यांनी माहेश्वरी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात तसेच गावात कुठलेही संकटसमयी हा समाज अग्रणी असतो. माहेश्वरी समाज व्यवसायाबरोबरच गावाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे,असे गौरोद्गार काढले.सदर प्रसंगी समाजातील 200 ज्येष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भगवद्गीता ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांचे आभार सचिव राधामोहन छापरवाल यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सारडा व सौ. संगीता सारडा यांनी केले.या वेळी ट्रस्टी प्रमुख श्रीवल्लभ बांगड,जिल्हा अध्यक्ष नितीन धूत, तहसील अध्यक्ष रामगोपाल मालानी, उपाध्यक्ष कमलेश राठी, कोषाध्यक्ष राधेश्याम बंग, सहसचिव धनराज डाळ्या, महिला अध्यक्ष निलम भराडिया,नवयुवक अध्यक्ष शेखर बांगड आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास महेश सेवा समितीचे कार्यकारणी,ट्रस्टी मंडळ व सर्व पदाधिकारी समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा