You are currently viewing वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन व्हेंटीलेटर भेट

वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन व्हेंटीलेटर भेट

वैभववाडी

वैभववाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला काँग्रेसचे नेते आणि वैभववाडी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.वाय.डी.सावंत यांचे सुपुत्र श्री.मकरंद सावंत व उद्योजक श्री.अनिल सेधा यांनी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले आहेत. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील कोव्हिड सेंटरमधील कोरोना रुग्णांना याचा फायदा होणार आहे. श्री.मकरंद सावंत यांनी यापूर्वी कणकवली नगरपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, कनेडी येथेही या कोरोना महामारीच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे. आपल्या वडिलांची समाजकार्याची परंपरा त्यांनी सुरु ठेवली आहे. वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी कोव्हिड सेंटरमध्ये व्हेंटिलेटरची गरज होती. सावंत यांच्या वडिलांचे नातेसंबंध वैभववाडीशी असल्याने सामाजिक भावनेतून पाच लिटरचे दोन व्हेंटिलेटर भेट दिले आहेत.

सदर व्हेंटिलेटर आज सकाळी वाय. डी.सावंत यांचे जावई श्री.महेश सावंत, ॲड.महेश रावराणे व प्रा.श्री. एस. एन. पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल पवार यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी डॉ. पवार यांनी श्री.मकरंद सावंत व श्री.अनिल सेधा यांचे आभार व्यक्त केले. यावेळी तालुका पर्यवेक्षक तथा विस्तार अधिकारी श्री. आनंद चव्हाण, डॉ.अभिजीत कुंभार, परिचारिका वैष्णवी घुगरदरे, परिचर माधुरी पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

हे दोन व्हेंटिलेटर प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळवून देण्यासाठी श्री.दिवाकर सावंत, कणकवली आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा. श्री. एस. एन. पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 12 =