You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात विविध आरोग्य विषयक समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस

दोडामार्ग तालुक्यात विविध आरोग्य विषयक समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस

दोडामार्ग

युवा आमदार नितेश राणे यांचा वाढदिनाचे औचित्य साधून दोडामार्ग तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने कोरोना संक्रमण काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या १५००० हजार आर्सेनिक आल्बम गोळ्यांचे वाटप केले जाणार आहेत. या कार्यक्रमाची आज ग्रामपंचायत कोनाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती डॉ.अनिषा दळवी व दोडामार्ग पंचायत समिती सदस्य लक्ष्मण उर्फ बाळा नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस, शैलेश दळवी, कोनाळ सरपंच पराशर सावंत, रंगनाथ गवस, संजय सातार्डेकर, घोटगे सरपंच संदीप नाईक, युवा मोर्चाअध्यक्ष दिपक गवस, महीला मोर्चा तालुकाअध्यक्ष कल्पना बुडकुले, पांडुरंग लोंढे, दिपक शेटये, लवू नाईक, रामा ठाकूर व इतर ग्रानस्थ उपस्थित होते.

साटेली भेडशी नेत्र तपासणी शिबीर

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे लाईफटाईम मेडिकल कॉलेज पडवे व प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी सभापती डॉ.अनिषा दळवी,पंचायत समिती सदस्य लक्ष्मण उर्फ बाळा नाईक,भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस,शैलेश दळवी,कोनाळ सरपंच पराशर सावंत,रंगनाथ गवस,संजय सातार्डेकर,युवा मोर्चाअध्यक्ष दिपक गवस,खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर,भैय्या पांगम,महीला मोर्चा तालुकाअध्यक्ष कल्पना बुडकुले,लवू नाईक व इतर उपस्थित होते.नेत्रतपासणी,मोतीबिंदू तपासणी,काचबिंदू तपासणी,अश्रूथैली तपासणी,डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळ्यांची जळजळ होणे,डोळे कोरडे पडणे,डोळ्यांच्या पापण्यांना काळी वलय येणे संबंधित रुग्णांची मोफत तपासणी लाईफटाईम मेडीकल कॉलेजचे सुभाष जाधव,जनसंपर्क अधिकारी श्री.परब,श्री.कुरतडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना अंडी वाटप

याशिवाय दोडामार्ग कोविड केअर सेंटर येथे दाखल रुग्णांना अंड्याचे वाटप करण्यात आले.यावेळी दोडामार्ग कोविड केअर सेंटर येथे डॉ.अनिषा दळवी,लक्ष्मण उर्फ बाळा नाईक,प्रविण गवस,रंगनाथ गवस,शैलेश दळवी,दिपक गवस आदी उपस्थित होते.

अशाप्रकारे दोडामार्ग तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्यावतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी आमदार नितेशजी राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा